शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

साईनगरी शिर्डीमध्ये उतरले पहिले विमान! मुंबईहून ३५ मिनिटांत पोहोचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 2:15 AM

जगभरातून येणा-या साईभक्तांना आता शिर्डीला विमानाने जाता येणार आहे. शिर्डी विमानतळावर मंगळवारी पहिले विमान यशस्वीपणे उतरले.

शिर्डी : जगभरातून येणा-या साईभक्तांना आता शिर्डीला विमानाने जाता येणार आहे. शिर्डी विमानतळावर मंगळवारी पहिले विमान यशस्वीपणे उतरले. आता १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे भक्तार्पण होईल. २ आॅक्टोबरला नियमित विमानसेवा सुरू होईल.मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावरून दुपारी सव्वाचार वाजता शिर्डीच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे ७२ आसनी विमान केवळ ३५ मिनिटात शिर्डी विमानतळावर पोहचले. साईनगरीच्या विमानाचा पहिला प्रवासी होण्याचा मान अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना मिळाला. त्यांच्याबरोबर केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकणी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर गुप्ता, विभागीय संचालक मुकेश भाटिया यांच्यासह चौदा जणांचा समावेश होता. राकेश शेट्टी व संदीप मेहरा या विमानाचे वैमानिक होते. संध्याकाळी हे विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने झेपावले़ विमानतळावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्यासह स्थानिक नेते स्वागतासाठी उपस्थित होते.ट्रायल लँडिंगचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली, हा मोठा योग आहे़ सुरूवातीला मुंबईहून चार, दिल्लीहून व हैदराबाद येथून प्रत्येकी एक अशा सहा विमानांच्या फेºया सुरू होतील़ धावपट्टीच्या विस्तारानंतर काही महिन्यात आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होईल.- राम शिंदे, पालकमंत्री, अहमदनगर

टॅग्स :Airportविमानतळ