लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत दारूची दुकाने उघडी राहणार आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून दुकाने सुरु करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी सोमवारी सायंकाळी काढला. त्यानुसार मंगळवारी सकाळी दहापासून दारुची दुकाने उघडणार आहेत. बाजार पेठेतील किंवा गर्दीच्या ठिकाणची दुकाने सुरू राहणार नाहीत. दुकानदाराने दुकानात काम करणाºया कर्मचाºयांची थर्मल स्कॅनिंग करायचे आहे. तसेच ग्राहकांनी सहा फुटाचे अंतर ठेवून दुकानासमोर थांबायचे आहे. अशा काही अटी-शर्ती सह ही परवानगी देण्यात आली आहे. दरम्या दारुच्या दुकानांसमोर प्रशासन आणि दुकान मालकांनी फिजिकल डिस्टन्सिंगसाठी चौकोन आखले आहेत. गेल्या ४० दिवसांपासून दारुची दुकाने बंद आहेत. या काळात अनेकांनी अवैध मार्गाने दारू मिळविण्याचा प्रयत्न केला.तसेच दारुच्या शोधार्थ नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले होते. अहमदनगरचा समावेश आॅरेंज झोनमध्ये झाल्यानंतर मद्यविक्रीचा मार्ग मोकळा झाला होता.
उद्या सकाळी दहापासून अहमदनगर जिल्ह्यात मद्यविक्री सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 7:41 PM