कोयटे म्हणाले की, समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला शिस्त लावून महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ सुदृढ झाली पाहिजे, वाढली पाहिजे, या भावनेने काम करीत असतात. १ हजार कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा गाठताना १३ शाखांच्या आधारे ५७० कोटी रुपयांच्या ठेवी मिळवून प्रतीशाखा ४४ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा व ७७ कोटी रुपयांचा प्रतीशाखा संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून समताने महाराष्ट्रात उच्चांक केला आहे. त्याच प्रमाणे लिक़्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाच्या आधारे तब्बल ७० हजार ठेवीदारांपैकी ६३ हजार ठेवीदारांच्या म्हणजेच ९८ टक्के ठेवीदारांच्या ६.५० लाख रुपयापर्यंतच्या ठेवी अति सुरक्षित केल्या आहेत. उर्वरित २ टक्के ठेवीदारांच्या ठेवीदेखील सुरक्षित कर्ज वितरण व कठोर वसुली याद्वारे सुरक्षित आहेत. १ जानेवारी २०२१ पासून क़्यु. आर. कोड, यू. पी. आय. सिस्टमद्वारे भारतातील कोणत्याही बँकेत जमा असलेल्या ग्राहकाचे पैसे समता पतसंस्थेच्या सभासद ग्राहकांच्या खात्यात जमा होऊ शकतील. सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांना घरपोहोच सेवा, शुअर सेल, शुअर पेमेंट ही व्यापाऱ्यांसाठी सुरू केलेली अभिनव सेवा, मोबाइल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, ऑनलाइन समता रिकव्हरी सिस्टम, ऑप्टीमायझर यंत्रणेद्वारे सुसज्ज असलेले ‘रेकॉर्ड रूम’ अशा अभिनव प्रकारच्या यंत्रणा उभारल्या आहेत.
सोने तारण व्यवसाय वाढविण्यावर विशेष भर दिला असून, ३१ डिसेंबरअखेर ८५ कोटी रुपयांचे सोने तारण कर्ज व ३५० कोटी रुपयांचे इतर सुरक्षित कर्ज वाटप करून ठेवीदारांची सुरक्षा कायम राखली आहे. कोरोना या संसर्गजन्य महामारीमुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊन काळातसुद्धा गेल्या सहा महिन्यात तब्बल ४० कोटी रुपयांनी समताच्या ठेवींमध्ये वाढ झाली असल्याची माहिती समता पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक जितु शहा व सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी दिली.