पुणतांबा : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. तरीही कोपरगाव, राहाता तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. रात्रीही वाळू माफियाचा धुमाकूळ सुरू आहे.
राहाता तालुक्यातील पुणतांबा, शिंगवे, श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथून गोदावरी नदीपात्रातून अहोरात्र वाळू उपसा सुरू आहे. संचारबंदीला श्रीरामपूर पोलीस, राहाता पोलीस, महसूल विभागाकडून केराची टोपली दाखवली आहे. सर्वसामान्य नागरिकांना मात्र दंड आणि पोलिसी खाक्याची भीती दाखविली जात आहे. मात्र, वाळू माफिया व त्यांचे पंटर दिवसरात्र नदीपात्रातून जेसीबी, पोकलेनच्या साह्याने वाळू उपसून नेत आहेत. ही वाळू शेती महामंडळाच्या जमिनीवर साठा करून ठेवली आहे. बिगर नंबरच्या डंपरने वाळू वाहतूक जोमात सुरू आहे. तरी याकडे महसूल व पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.