पारनेर : तालुक्यातील संदीप वराळ यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्रात तीन बोगस साक्षीदारांची साक्ष नोंदवल्याची याचिका या प्रकरणातील जामीनावर सुटलेले संशयित आरोपी बबन कवाद यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली होती. याप्रकरणी या तीन साक्षीदारांची श्रीरामपुरचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक यांच्या समितीने चार आठवड्यात चौकशी करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.पारनेर तालुक्यातील निघोज येथील कॉंग्रेसचे युवा नेते व पारनेर बाजार समीतीचे माजी उपसभापती संदीप वराळ यांच्या हत्याप्रकरणात दारूबंदी चळवळीचे प्रणेते बबन कवाद यांचा संशयित आरोपीत समावेश आहे. बबन कवाद यांनी पोलिसांनी वराळ खून खटल्यात तयार केलेल्या दोषारोपत्रात अनेक त्रृटी आहेत, यातील तीन साक्षीदार बनावट असल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची न्यायालयाने गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश न्यायाधीश आऱ एम़ बोर्डे व मंगेश पाटिल यांनी दिले आहेत़ यानुसार नगरचे पोलिस अधिक्षकांनी श्रीरामपुरचे अतिरीकत पोलिस अधिक्षकांनी चौकशी समिती नेमली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री व मानवी हक्क आयोग यांनीही दखल घेतली आहे.