लोकमत आॅनलाइन संगमनेर : संगमनेर तालुका विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन केले. महाराष्ट्रात उच्च माध्यमिकचे २२ हजार पाचशे शिक्षक विनाअनुदानित तत्वावर काम करीत आहेत. गेल्या १६ वर्षांपासून हे शिक्षक विनापगारी काम करीत आहेत. शासनाने उच्च माध्यमिकचा कायम हा शब्द २०१२ साली काढून २०१४ साली मूल्यांकन केले तरीही अद्याप अनुदानाची कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. आत्तापर्यंत अनेक आंदोलने कृती समितीमार्फत करण्यात आलेली आहे. अद्याप शासनाने कुठल्याच प्रकारे दखल घेतलेली नाही. यामुळे शिक्षकांचे दैनंदिन जगणे मुश्किल झाले असून उपासमारीची वेळ आलेली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबा खरात, संगमनेर तालुका विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीचे अध्यक्ष बाबासाहेब कोळेकर, अविनाश शेळके, नवनाथ डोखे, राजेंद्र आडभाई, आबू इनामदार, संतोष बिबवे, संतोष भालेराव, बाळासाहेब गुंजाळ आदि शिक्षकांनी तहसीलदार साहेबराव सोनावणे यांना निवेदन दिले.
संगमनेर तालुक्यीतल शिक्षक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 2:31 PM