शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

संग्राम जगताप यांनी राखला नगरचा गड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 4:20 PM

आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाने नगर शहरावरील राष्ट्रवादीची मांड पक्की झाली़. गतवेळी जगताप यांचा निसटता विजय झाला़ त्यामुळे सेनेला येथून आशा होती़. परंतु, सरळसरळ झालेल्या लढतीत संग्राम जगताप यांनी सेनेच्या राठोड यांना चितपट करून नगरचा गड राखला़.

अहमदनगर मतदारसंघ विश्लेषण - अण्णा नवथर । अहमदनगर : आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाने नगर शहरावरील राष्ट्रवादीची मांड पक्की झाली़. गतवेळी जगताप यांचा निसटता विजय झाला़ त्यामुळे सेनेला येथून आशा होती़. परंतु, सरळसरळ झालेल्या लढतीत संग्राम जगताप यांनी सेनेच्या राठोड यांना चितपट करून नगरचा गड राखला़.गत विधानसभा निवडणुकीत झालेल्या चौरंगी लढतीत संग्राम जगताप यांनी बाजी मारली़. २५ वर्षे आमदार राहिलेल्या अनिल राठोड यांना आस्मान दाखविले़. लोकसभा निवडणूक जगताप यांनी भाजपचे डॉ़. सुजय विखे यांच्याविरोधात लढविली़. या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला़. तेव्हापासूनच त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली़. ‘विकासासाठी वन्स मोअर’, हा मुद्दा जोरकसपणे ते निवडणुकीत मांडत राहिले़. सेनेने गुंडगिरी आणि भयमुक्त नगरसाठी उमेदवारी, हा जुनाच मुद्दा पुढे आणला़. भयमुक्त नगर, यापेक्षा नगरकरांनी यावेळी विकासाला साथ दिली़. जगताप यांना मध्यवर्ती शहर वगळता, सर्वच ठिकाणाहून कमी अधिक प्रमाणात मताधिक्य मिळाले़. होम टू होम प्रचार करत जगताप यांनी राठोड यांच्यासमोर आव्हान उभे केले़. महापालिका निवडणुकीतही जगताप यांनी भाजप लाटेतही लक्षणीय विजय मिळविला़. लोकसभेत सेनेने शहरात विखे यांचे काम केले़. त्यामुळे विधानसभेत खासदार विखे आणि शहर भाजप, यांचे सेनेला बळ मिळाले़. परंतु, संग्राम जगताप व वडील अरुण जगताप यांच्यापुढे विखे यांची यंत्रणा कमी पडली़.  संग्राम जगताप हे सेनेकडून की भाजपकडून, असा संभ्रम शेवटपर्यंत राहिला़. सेनेत कधी नव्हे ते यावेळी इच्छुकांची संख्या वाढली़. उमेदवारी कुणाला, यातच सेना गुरफटली गेली.  तोपर्यंत जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली होती़. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या़ पण, ते नगरमध्ये आले नाहीत़. पक्षाच्या नेत्याची एकही सभा न घेता निवडून येणारे जगताप हे जिल्ह्यातील पहिले आमदार आहेत़. संग्राम जगताप यांनी संकल्पनामा जाहीर केला व तो सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरकरांपर्यंत पोहोचविला़. प्रचारात राष्ट्रवादी आघाडीवर होती़. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता़. तसा सेनेच्या गोटात दिसला नाही़. नेहमीप्रमाणे सेनेचे सर्वच नेते प्रचारात कमीच दिसले़. 

टॅग्स :Sangram Jagtapआ. संग्राम जगतापAhmednagarअहमदनगर