पाथर्डी : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून येथील अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानने पाथर्डी उपनगरात स्वच्छता अभियान राबविले.
राष्ट्रीय छात्र सेना, स्थानिक रहिवासी व प्रतिष्ठानचे स्वयंसेवक यांनी या अभियानादरम्यान भगवाननगर तसेच फुले नगरमधील भगवान उद्यान, क्रीडांगण व रस्त्यांची साफसफाई करून इतर परिसरातील गाजर गवत, प्लास्टिक कचरा आदींचे निर्मूलन करण्यात आले, तसेच उपनगर परिसरातील वाढलेल्या अनावश्यक झाडा-झुडपांची छाटणी यावेळी करण्यात आली.
यावेळी पाथर्डी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी सर्व स्वयंसेवकांना स्वछ भारत अभियानाचे महत्त्व पटवून देऊन या अंतर्गत चाललेल्या विविध उपक्रमांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेवक प्रसाद आव्हाड, नगरसेविका दुर्गा भगत, गोरक्ष शिरसाट, शिवाजीराव खेडकर, देवराव भोईटे, उमाजी काकडे, मनोज ढाकणे, धनंजय कुलकर्णी, जायभाये मेजर, माणिक खेडकर, सूर्यभान दहीफळे, आत्माराम दहीफळे, रामनाथ फुंदे, सुभाष खेडकर, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, डॉ. बबन चौरे, कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे, नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक दत्ता ढवळे, कामगार मुकादम शिवा पवार, बादल पलाटे आदी उपस्थित होते.
फोटो : ३१ पाथर्डी
पाथर्डीत अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानने स्वच्छता अभियान राबविले.