शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

संजय कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ठरली विद्यार्थीप्रिय कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 2:52 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला विभागाच्या अभ्यासक्रमात येथील साहित्यिक डॉ़ संजय कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ही कथा विद्यार्थीप्रिय ठरली आहे़. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळालेले कळमकर हे नगर जिल्ह्यातील पहिलेच साहित्यिक आहेत़.

अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला विभागाच्या अभ्यासक्रमात येथील साहित्यिक डॉ़ संजय कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ही कथा विद्यार्थीप्रिय ठरली आहे़. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळालेले कळमकर हे नगर जिल्ह्यातील पहिलेच साहित्यिक आहेत़.प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातील ‘समकालिन मराठी कथा’ या क्रमिक पुस्तकात कळमकर यांची ‘शुभमंगल सावधान’ ही कथा आहे़. या पुस्तकाचे संपादन डॉ. शिरीष लांडगे, डॉ. दिलीप पवार, डॉ. संदीप सांगळे यांनी केले आहे. कळमकर यांनी विवाहातील प्रथांचा फोलपणा रंजक पद्धतीने या कथेत मांडला आहे. विवाहाचा मूळ हेतू बाजूला पडून भव्यदिव्यता; उत्सवी स्वरुप, श्रीमंतीचा बडेजाव, खोटी प्रतिष्ठा, अमाप खर्च, राजकीय पुढा-यांची सहेतूक हजेरी यालाच आपल्याकडील विवाहात जास्त महत्त्व आले आहे. यावर भाष्य करताना कळमकर यांची कथा विनोदी अंगाने हसता- हसवता अंतर्मुख करते. म्हणूनच नर्मविनोदी शैलीतील ही कथा विद्यार्थ्यांना  भावली आहे. कथेमध्ये विवाहातील सोपस्कार, त्यातील संगती -विसंगती, गंमतीजमती प्रत्ययकारीपणे प्रकट झाल्या आहेत. उपरोध, उपहास आणि विविध विनोदी प्रसंगातून हे कथानक लय पकडते. सहज, सोप्या भाषेत वास्तवतेला विनोदाच्या साहाय्याने कथारुप दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये कळमकर यांची कथा प्रिय झाली आहे़. लग्न विधीतील पैशांच्या उधळपट्टीतून निर्माण होणा-या समस्यांचे, प्रथा-परंपरेचे कंगोरे उलगडत त्यांची कथा मानवी स्वभावातील विसंगतीवर प्रहार करते़. प्रसिद्धीचा हव्यास, धूर्तपणा, संधीसाधूपणा यातून साधलेला विनोद कथेची उंची वाढवणारा असल्याने ही कथा विद्यार्थ्यांच्या आवडीची ठरली आहे, असे मराठी विषय शिकविणा-या प्राध्यापकांचा अभिप्राय असल्याची माहिती कळमकर यांनी दिली़.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये मराठी विषय शिकविणा-या अनेक प्राध्यापकांकडून मला प्रतिक्रिया येत आहेत़. महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांसाठी गेल्यानंतरही विद्यार्थी आवर्जुन ‘शुभमंगल सावधन’ या कथेविषयी प्रतिक्रिया देतात व ही कथा आमची आवडती कथा असल्याचे सांगतात़ या कथेतून विवाहातील अनावश्यक बाबींवर केलेल्या मार्मिक टिपण्या कायम स्मरणात राहत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे़. या कथेतील काही उतारे, प्रसंग विद्यार्थ्यांच्या तोंडपाठ झाल्याचे पाहून आनंदाचा सुखद धक्का बसला, असे कळमकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर