शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मनोरुग्ण, अनाथांच्या मदतीला धावणारा संजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 3:29 PM

कुकाणा परिसरातील मनोरुग्ण, अनाथांच्या मदतीला धावून जाणा-या संजय वाघ यांच्या कार्याचे सध्या कौतुक होत आहे.

सुनील पंडीत । कुकाणा : नेवासा तालुक्यातील कुकाणा परिसरातील मनोरुग्ण, अनाथांच्या मदतीला धावून जाणा-या संजय वाघ यांच्या कार्याचे सध्या कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी येथील एका मनोरुग्ण महिलेला डॉ. राजेंद्र धामणे यांच्या माउली सेवा प्रष्ठिानच्या माध्यमातून हक्काचा निवारा मिळवून दिला.संजय वाघ हे जानेवारी २०१८ पासून ‘एक दिवस समाज सेवे’साठी हा मंत्र घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. वंचित, गोरगरीब, मनोरुग्ण, अनाथ व आश्रम शाळेतील विद्यार्थी यांच्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. तसेच त्यांनी अनेक अनाथांची मोफत दाढी-कटींग करून दिली आहे. अनेक मनोरुग्ण, इतरत्र भटकणारे यांना आंघोळ घालून त्यांना नवे कपडे देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. यंदाच्या दिवाळीत त्यांनी कुकाणा परिसरातील लष्करी जवानांसाठी नवा उपक्रम राबविला. लष्करात असलेले व सध्या सुटीवर आलेल्या जवानांची त्यांनी मोफत दाढी-कटींग करून दिली. गेल्या काही दिवसांपासून कुकाणा बसथांबा परिसर व गावात एक मनोरुग्ण महिला फिरत होती. वाघ यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी अहमदनगर येथील माउली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे यांच्याशी संपर्क केला व संबंधित महिलेची माहिती दिली. डॉ. धामणे यांनी त्या महिलेला येथे घेऊन या असे सांगितले. त्यानंतर वाघ यांनी मित्र परिवाराच्या मदतीने त्या महिलेस माउली सेवा प्रतिष्ठान आश्रम येथे डॉ. धामणे यांच्या स्वाधीन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शुभम कदम, संदीप बेळगे, जयवंत मोटे, लखन गरड, कचरू लिंगायत आदी उपस्थित होते. या सामाजिक कार्यासाठी सिद्धार्थ कावरे, राम वाबळे, ग्रामसेवक संजय वाघ, किरण राऊत, महेश सावंत, तुषार कल्हपुरे, महावीर पटवा, तोफिक इनामदार, अरुण फोलाणे, डॉ. ज्ञानदेव गरड, रामेश्वर तुपे यांनी आर्थिक सहकार्य केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर