कोपरगाव : उद्योग जगतासाठी १२५ वर्षांपासून कार्य करीत असलेल्या काॅन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज संस्थेने संजीवनी काॅलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या औषध निर्माणशास्त्र शाखेतील पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या संस्थेला ‘प्लॅटीनम’ पुरस्काराने गौरविले आहे. सीआयआयने संजीवनीला जाहीर केलेला देश पातळीवरील हा सर्वोच्च पुरस्कार दिला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
देशात सुमारे १७०० सरकारी व खासगी बी. फार्मसी संस्था आहेत. मागील सात वर्षांपासून सीआयआय या संस्थेमार्फत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (नवी दिल्ली) मंजुरी प्राप्त इंजिनिअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चर संस्थांची देशातील इंडस्ट्रीज प्रती असलेल्या योगदान व समन्वयाबाबत दखल घेऊन सीआयआयच्या कसोट्यांमध्ये उतरलेल्या संस्थांना प्लॅटीनम, गोल्ड आणि सिल्वर वर्गवारीमध्ये पुरस्कार जाहीर केले जातात. सर्व बाबींची सीआयआयने खातरजमा करुन संजीनवी फार्मसी महाविद्यालयाला प्लॅटीनम पुरस्कार जाहीर केला. देशातील २७ सर्वोत्कृष्ट महाविद्यालयात ‘संजीवनी’चा समावेश असल्याचेही कोल्हे यांनी म्हटले आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून प्राचार्य डाॅ. किशोर साळुंखे, डाॅ. सरिता पवार, प्रा. गिरीश काशीद यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
.........
040121\amitdada photo.jpg
फोटो०४- अमित कोल्हे, कोपरगाव.