अहमदनगर : ‘नगर जिल्ह्याच्या राजकारणातून तिला एकच गोष्ट कळाली, लग्न एकाबरोबर अन् दुसऱ्याबरोबर पळाली’ प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांची ही चारोळी गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे़ फुटाणे यांनी खुमासदार शैलीतून लोकसभा निवडणुकीनिमित्त उकळणाºया नगरी राजकारणाला चांगलाच तडका दिला आहे़फुटाणे यांची ही चारोळी नगरी राजकारणाचा मतितार्थच उलगडून दाखविते़ त्याचं कारण असं की, तीन दिवसांपूर्वी मढी (ता़ पाथर्डी) येथे पतीसोबत देवदर्शनाला आलेल्या नवरीने प्रियकरासोबत धूम ठोकली़ लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रासह देशात गाजले ते नगरचे पक्षांतर! नगरच्या बड्या नेत्यांनीही आधीचे भरेपुरे घर सोडून दुसऱ्यांसोबत घरोबा केला (पक्षांतर)़ युद्धात आणि राजकारणात सगळं काही माफ असतं़ अशी एक जुनी म्हण आहे़ पण आता ‘युद्धात, प्रेमात आणि राजकारणातही सगळं काही माफ असतं’ या नव्या म्हणीला जनतेनेही ‘जनाश्रय’ दिल्याचे दिसले़ नव्या नवरीचे पळणे अनेकांना खटकलं, त्या बातमीवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या़ फुटाणे यांना मात्र नवरीचं सैराट प्रेम अन् नेत्यांचे पक्षांतर यात बरंच साम्य दिसले़ त्यांनी विनोदी शैलीतून सध्याच्या राजकारणावर केलेली उपहासात्मक टीका चांगलीच गाजली़ सैराट फेम रिंकू राजगुरु हिचा ‘पे्रमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं’ या थीमलाईनवर आलेला कागर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला़राजकारण आणि प्रेम अशा संयुक्त मिश्रणाचं कथानक या चित्रपटाचे आहे़ ‘प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं़’ आता प्रियकरासोबत पळालेल्या नवरीचे पुढे काय होणार? अन् पक्षांतर करणाºयांचेही़़़!
सैराट नवरी़ , नगरचे राजकारण अन् फुटाणेंची चारोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 3:14 PM