याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात हल्ल्यात जखमी झालेला तरुण दिनेश मनोहर पंडित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय राजू पठारे याच्यासह संतोष नवगिरे, गणेश सुरेश पठारे व एक अनोळखी आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० मार्च रोजी विजय पठारे त्याचा भाऊ अजय पठारे व इतर आरोपींनी शहरातील बालिकाश्रम रोडवरील दोन दुकानांमध्ये घुसून लुटमार केली होती. तसेच या दोघा भावांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे. त्यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तोफखाना पोलिसांनी नुकताच या टोळीविरोधात मोक्काचा प्रस्ताव सादर केला आहे. सराईत गुंड वारंवार नागरिकांवर हल्ले करून दशहत निर्माण करत असताना पोलिसांना तो सापडत नसल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.