निंबळक : मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करत इसळक (ता.नगर) येथील सरपंच छाया गेरंगे व उपसरपंच शोभा खामकर यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
इसळक येथे सरपंचपदाचा पदभार घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यानिमित्त ग्रामपंचयात इसळक व आनंदऋषी हॉस्पिटल यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर जिल्हा परिषद मराठी शाळा येथे घेण्यात आले.
यावेळी माजी सरपंच संजय गेरंगे, अमोल शिंदे, प्रियंका लामखडे, भारती शिंदे, विशाल पवार, पोपट तांबे, पोपट खामकर, किसन गेरंगे, अरविंद बेरड, देवानंद शिंदे, नवनाथ गेरंगे, अशोक गेरंगे, शिवाजी थोरात, अनिल जाधव, गणेश चव्हाण, सीताराम सकट, प्रमोद माने, मारूती शिंदे, विशाल शिंदे, विठ्ठल शिंदे, उत्तम शिंदे, संदीप पटेकर, महादेव काळे, सदाशिव गेरंगे, चंद्रभान गेरंगे आदी उपस्थित होते.
----
२२ इसळक
इसळक येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करत सरपंच, उपसरपंचांनी पदभार स्वीकारला.