अहमदनगर : महापालिकेच्या सावेडी डेपोतील दोन ते तीन एकरावर पसरलेल्या कचऱ्याला रविवारी सकाळी आग लागली. वाºयाने डेपोतील सर्वच कचरा खाक झाला. तब्बल चार तास प्रयत्न करूनही आग आटोक्यात येत नसल्याने महापालिकेच्या अधिकाºयांची चांगलीच दमछाक झाली. परिसरात आग पसरणार नाही, यासाठी चार अग्निशमन बंबांनी अथक प्रयत्न करून दुपारी दोनच्या सुमारास आग आटोक्यात आणली.सावेडी भागातील आठरे पाटील स्कूल ते औरंगाबाद रोड या परिसरात महापालिकेतील सावेडीचा कचरा डेपो आहे. तब्बल २० एकर एवढ्या जागेत हा डेपो उभारण्यात आलेला आहे. याच जागेत खतनिर्मिती प्रकल्प आहे. दोन ते चार एकरावर मोकळा कचरा टाकण्यात येतो. डेपोच्या शेजारील शेतात गवताला लागलेली आग डेपोतील कचºयापर्यंत गेली. वाºयाने आग भडकल्याने सर्वच कचरा खाक झाला. सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ही आग लागली. कचºयाच्या ढिगाखाली आग धगधगत असल्याने पाण्याचा मारा करूनही आग विझत नव्हती. कचºयाने पेट घेतल्याने धुराचे लोळ आकाशात दिसले. तो धूर पाहताच अनेकांनी डेपोकडे धाव घेतली. महापालिकेचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे सर्वात आधी डेपो परिसरात पोहोचले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी लगेच महापालिकेच्या बंबांना पाचारण केले. मात्र डेपोत आल्यानंतर दोन्हीही बंब बंद पडले. त्यामुळे व्हीआरडीई, एमआयडीसीचे बंब पाचारण करून आग विझविण्यात आली. आग पसरत असल्याचे लक्षात येताच देवळारी प्रवरा, श्रीगोंदा, राहुरी नगरपालिकेचे बंब मागविण्यात आले. चार बंबांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनीही दर अर्धा तासाला डेपोतील आगीचा आढावा घेतला आणि अन्य नगरपालिकांमध्ये संपर्क साधून बंब पाठविण्यासाठी पाठपुरावा केला.दोन एकरावरील कचरा खाकखत निर्मितीसाठीच्या कच-याव्यतिरिक्त कचरा दोन एकर जागेत टाकला जातो. याच कच-याला आग लागली. जळालेला कचरा एक ते दीड हजार टन होता. कचरा जळाल्याने महापालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही. कोट्यवधी रुपयांच्या खत निर्मिती प्रकल्पाचे अंतर दूर असल्याने या आगीपासून हा प्रकल्प सुरक्षित राहिला.