पारनेर : तालुक्यातील निघोज येथून वाहणाऱ्या कुकडी कालव्याच्या १९ चारीजवळ कपडे धुण्यासाठी गेलेली रंजना संभाजी कवडे व त्यांचा तीन वर्षांचा मुलगा कालव्यात पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास घडली. दरम्यान, तेथेच असणारा त्यांचा पती संभाजी कवडे यांनी प्रसंगाधान राखून कालव्यात उडी मारून पत्नी व मुलास बाहेर काढल्याने दोघांचे प्राण वाचले. तेथून चाललेल्या तहसीलदार भारती सागरे यांनी दोघांना निघोज येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.निघोज येथून कुकडी कालवा जातो. कालव्याच्या एकोणीस क्रमांकाच्या चारीनजीक रंजना संभाजी कवडे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा तीन वर्षांचा मुलगाही बरोबर होता. त्या कपडे धूत असताना त्या शेजारी असणाऱ्या तीन वर्षांच्या मुलासह कालव्याच्या पाण्यात पडल्या. ते दोघे कालव्यात पडल्याचे समजताच महिलेचा पती संभाजी कवडे व काही लोक कालव्याजवळ धावून गेले व कालव्यात उडी टाकून मुलगा व पत्नीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळवले. याचवेळी तेथून चाललेल्या तहसीलदार भारती सागरे यांना येथे गर्दी दिसल्यावर त्या घटनास्थळी गेल्या व जखमी महिला व मुलाला आपल्या शासकीय वाहनातून निघोज येथील रुग्णालयात नेण्यात आले. सदर महिला सुखरूप असून मुलाला उलट्यांचा त्रास सुरू होता.(तालुका प्रतिनिधी)
कालव्यात वाहून जाणाऱ्या पत्नी, मुलाला वाचविले
By admin | Published: April 29, 2016 11:21 PM