अकोले : तालुक्यातील डोंगरदरीच्या बंबाळ्या माळरानावर वसंत ऋतूची चाहुल देणारी सायर, पळस, पांगारा आदी रानवृक्षांची लालबुंद टपोरी फुले फुलली आहेत. यातच करवंद, चाफा यांसारख्या झाडांची पांढरी शुभ्र तेजोमय रानफुलेही बहरली आहेत. ही फुले पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
फाल्गुन - चैत्राच्या उन्हाची दाहकता त्यामुळे कमी जाणवताना दिसत आहे.
पहाटे थंडी आणि दिवसभर कडकडीत ऊन असा सध्या कालखंड सुरु आहे. उन्हाळ्यात जत्रा, यात्रांचा महोत्सव सुरू होतो. मात्र, कोविड संंकटामुुळे यात्रा रद्द केली आहे. यंदा आंब्याच्या झाडांचा मोहोर जास्त दिसत आहे. रानफुलांवर व आंब्याच्या मोहोराभोवती मधमाशांची मध गोळा करण्यासाठीची रुंजी सुरु झाली आहे. काही प्रमाणात गांधारीच्या बहुरंगी फुलांबरोबर वरस, कुडा, अंजन, ग्लॅरिसिडीया अशी फुले बहरली आहेत. सह्याद्रीच्या डोंगराईत भाद्रपद महिन्यात सर्वात जास्त जवळपास साडेसहाशे रानफुले फुलतात.
...
२१सायर अकोले
२१पागारा अकोले
२१चाफा अकोले