शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

टंचाई तीव्र, नगर जिल्ह्यात २६२ टँकरने ५ लाख लोकांना पाणीपुरवठा

By चंद्रकांत शेळके | Published: April 30, 2024 9:05 PM

ग्रामीणसह आता नगरपालिका क्षेत्रातही टँकरची गरज भासू लागली आहे. 

अहमदनगर : जिल्ह्यात उन्हाचा पारा जसजसा वाढत आहे, तसतशा टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे रोज टँकरची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या एका महिन्यात जिल्ह्यात तब्बल २०० टँकरची भर पडली असून, सद्य:स्थितीत टँकरची संख्या २६२ वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक ८९ टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत. तर ग्रामीणसह आता नगरपालिका क्षेत्रातही टँकरची गरज भासू लागली आहे. 

दरवर्षी ॲाक्टोबर ते जून या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार केला जातो. यंदा ८४ कोटी ४५ लाख रुपयांच्या जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेली आहे. यात पाण्याच्या टँकरच्या खर्चासाठी ८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.दरम्यान, या आराखड्यात १ हजार १८५ गावांत आणि ३ हजार ८८६ वाड्या- वस्त्यांवर पुढील जून २०२४ पर्यंत संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.

उन्हाळ्याचे अडीच महिने सरले आहेत. यातच टँकरची संख्या २६२ वर पोहोचली आहे. मार्चच्या प्रारंभी साधारण टँकर सुरू झाले. १९ मार्चला जिल्ह्यात ५३ टँकर सुरू होतो. तेथून पुढे झपाट्याने टँकरची संख्या वाढली. १३ एप्रिलला १५८ टँकर, १९ एप्रिलला २१०, तर आता २६२ वर टँकरचा आकडा पोहोचला आहे. मे महिन्यात आणखी उष्णता वाढण्याची शक्यता असल्याने टँकरचा आकडाही झपाट्याने वाढणार आहे.  रोज वाढताहेत टँकरजिल्ह्यात दिवसेंदिवस टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे टँकरची संख्याही रोज वाढत आहे. सध्या जिल्ह्यात २४६ गावे व १३६७ वाडी-वस्तीवरील ५ लाख १० हजार लोकांना २६२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात सर्वाधिक ८९ टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत. तालुका टँकर संख्यासंगमनेर २५अकोले ५नेवासा २नगर १८पारनेर २९पाथर्डी ८९शेवगाव १०कर्जत ३४जामखेड १८श्रीगोंदा ९पाथर्डी नगरपालिका १कर्जत नगरपालिका १२पारनेर नगरपालिका २श्रीगोंदा नगरपालिका ४शेवगाव नगरपालिका १---------एकूण २६२ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर