शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती परीक्षांबाबत २९ एप्रिल रोजी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना पत्र दिले होते. चार मे रोजी शिक्षण आयुक्तांनी कपिल पाटील यांच्या पत्रावर शेरा मारत ‘परीक्षा रद्द करण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात’ असे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला दिले होते. त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्याबाबत सोमवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी निर्णय जाहीर केला आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली आहे.
या निर्णयाचे स्वागत जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहमंद समी शेख, योगेश हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, संभाजी चौधरी, नवनाथ घोरपडे, कैलास जाधव, गोरखनाथ गव्हाणे, संजय भुसारी, सोपानराव कळमकर, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, संध्या गावडे, अनघा सासवडकर, रेवन घंगाळे, जॉन सोनवणे आदींनी केले आहे.