अहमदनगर- वॅक्सिन आल्याशिवाय शाळा, कॉलेज सुरु करू नये, असे निवेदन शिक्षक भारतीच्या वतीने आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,,शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिली असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
यंदाचे शैक्षणिक वर्ष 2020 - 21 आणि पुढील शैक्षणिक वर्ष 2021 - 22 ही दोन्ही क्लब करावीत. मुख्य सणांच्या सुट्ट्या वगळून अन्य सुट्ट्या कमी कराव्यात. महापुरुषांच्या जयंतींनाही शाळा, कॉलेज चालू ठेवावीत.अभ्यासक्रम कुठेही कमी न करता तो पुढील काळात भरून काढण्यात यावा. डिसेंबर महिन्यात वॅक्सिन आले तर जानेवारी पासून त्यावेळची परिस्थिती बघून शाळा, कॉलेज रीतसर सुरू करावीत. सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम वॅक्सिन देण्यात यावे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या चार महिन्यात अभ्यासक्रम भरून काढावा. सहामाही परीक्षा किंवा सत्र परीक्षा घेऊ नयेत. थेट वार्षिक परीक्षा आणि 10 वी, 12 वी च्या परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहील्या आठवड्यात त्यावेळची परिस्थिती बघून घेण्यात याव्यात.
2020 - 21 च्या पहिल्या शैक्षणिक वर्षात राहिलेला अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्ष 2021 - 22 मध्ये भरून काढण्यात यावा. पुढील शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात यावे.,याबद्दल सर्वांशी विचार विनिमय करून निर्णय घ्यावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत जानेवारीपूर्वी शाळा, कॉलेज प्रत्यक्ष सुरू करू नयेत. तोपर्यंत शिक्षकांना सर्व अशैक्षणिक कामातून वगळून फक्त वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात यावी. मागच्या काही महिन्यात काही शिक्षक, कर्मचारी यांचे कोविडमुळे झालेले निधन लक्षात घेता त्यांना शाळा, कॉलेजमध्ये येण्याची सक्ती करू नये.
ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शिक्षक भारतीचे आमदार कपील पाटील राज्याध्यक्ष अध्यक्ष अशोक बेलसरे राज्य सचिव सुनिल गाडगे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे .आदींनी केली आहे