या कार्यक्रमाची सुरुवात सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आले. यावेळी टाळी वाजवून बल्ब प्रकाशित करून करण्यात आला. याप्रसंगी शुभदा खेर, आदित्य देवचक्के, मुख्याध्यापक संजय मुदगल, पर्यवेक्षिका अलका भालेकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. खेर म्हणाले, यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. यात आपली आर्थिक परिस्थिती अडथळा ठरू शकत नाही. विज्ञानवाद माणसाला हुशार बनवीत असून, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्राचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. आदित्य देवचक्के म्हणाले, गरजेतून विविध शोध लागतात. यासाठी विद्यार्थ्यांनी चिकित्सकदृष्टी ठेवून अभ्यास केला पाहिजे. ध्येय निश्चित केल्याय यश निश्चित मिळते. आपल्यातील चांगल्या क्षमतांचा उपयोग केल्यास यश मिळते. मुख्याध्यापक संजय मुदगल व पर्यवेक्षिका अलका भालेकर यांनी विज्ञान दिनाबाबतची माहिती दिली. यावेळी विनोद देसाई, सुजाता खामकर यांनी मनोगत व्यक्त केले. वृषाली जोशी यांनी प्रास्तविक केले, तर दीपाली लगड यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. क्रांती मुंदानकर यांनी सूत्रसंचालन केले.
---
फोटो -०२ सीताराम सारडा
सीताराम सारडा विद्यालयात विज्ञान दिनानिमित्त डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन टाळी वाजवून बल्ब प्रकाशित करून करण्यात आले. याप्रसंगी प्रा. मकरंद खेर, शुभदा खेर, आदित्य देवचक्के आदी.