शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

उमेदवारीसाठी सेनेत रस्सीखेच

By admin | Published: October 27, 2016 12:33 AM

विनोद गोळे , पारनेर नव्याने अस्तिवात आलेल्या सुपा जिल्हा परिषद गटाला वाडेगव्हाण जोडल्याने जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने

विनोद गोळे , पारनेरनव्याने अस्तिवात आलेल्या सुपा जिल्हा परिषद गटाला वाडेगव्हाण जोडल्याने जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारीसाठी रस्सीचेच होणार आहे. तर राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या दुसऱ्या गटाला जागा सोडणार आहे. भाजपाही रिंंगणात उतरणार आहे. काँग्रेसचा निर्णय कुणाशी युती करणार यानंतर होणार आहे.पारनेर-सुपा असलेला जिल्हा परिषद गट आता नव्याने सुपा-वाडेगव्हाण झाला आहे. यामुळे वाडेगव्हाण गणावर सेनेची मोठी भिस्त राहणार आहे.सुपा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने आता सेनेमध्ये पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या सौभाग्यवती सुषमा, नारायणगव्हाणचे सरपंच सुरेश बोऱ्हुडे यांच्या सौभाग्यवती मीनाक्षी व मुंगशीचे सुनील थोरात यांची सौभाग्यवती निर्मला इच्छुक आहेत. सुषमा गणेश शेळके यांनी गावोगावी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. गणेश शेळके सभापती असल्याने सुपा गटात त्यांनी दौरे वाढविले आहेत. सुपा गणातून सेनेचे तालुकाप्रमुख नीलेश लंके यांना उमेदवारी दिल्यावर शेळके यांना बळ मिळेलच, शिवाय वाडेगव्हाण हा हक्काच्या गणाचा फायदा होईल, असे गणित शेळके यांचे कार्यकर्ते मांडीत आहेत. निर्मला सुनील थोरात यांनी आपलाच उमेदवारीवर हक्क असल्याचे सेनेकडे सांगत आहेत. आता थांबायचे नाही, लढायचे असा संदेशही त्यांनी सेनेला दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीची काँग्रेसच्या दुसऱ्या गटाशी युती होणार आहे. त्यांना सुपा गटाची जागा देण्यात येणार असून तेथे काँग्रेसच्या दुसऱ्या गटाचे युवा नेतृत्व राहुल शिंदे यांच्या मातु:श्री वैशाली अण्णा पाटील शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मृत्युंजय प्रतिष्ठानचे प्रमुख नितीन शेळके यांनी गटातील प्रत्येक गावात शाखा उघडून युवकांचा मोठा समूह हाताशी धरून बस्तान बसवले आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद मिळवतानाच आपल्या सौभाग्यवती सुषमा शेळके यांच्यासाठी भाजपाची उमेदवारीही त्यांनी निश्चित केली आहे.