जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी जिल्हास्तरीय तपासणीचा अहवाल नुकताच दिला होता. राहाता येथील समितीने एक महिन्यापूर्वी जाफराबाद ग्रामपंचायतीला ८६ गुण देत तालुक्यातील स्मार्ट ग्राम म्हणून घोषित केले होते. दुसऱ्या क्रमांकावरील मुठेवाडगाव ग्रामपंचायतीने राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप करीत फेरतपासणीची मागणी केली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुनर्तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन्ही ग्रामपंचायतींना समान गुण मिळाल्यामुळे दोन्ही ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम म्हणून घोषित करण्यात आल्या. १० लाखाचे बक्षीस विभागून देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विशेष समितीने मुठेवाडगाव व जाफराबाद ग्रामपंचायतीची नुकतीच तपासणी केली. त्याचा निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे. गत वर्षी महाकांळवाडगाव ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय स्मार्टग्राम पुरस्कार मिळाल्याची माहिती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजय चराटे यांनी दिली आहे.
------------------------------
मोबाइल शॉपी फोडून १० लाखांचा मुद्देमाल लंपास
श्रीरामपूर : शहरातील नेवासा रोड बसस्थानक व राधिका लॉजजवळील आर. बी. कासलीवाल या मोबाईल शॉपीचे लॉक अज्ञात चोरट्यांनी कटावणीच्या साहाय्याने तोडून शॉपीत प्रवेश करून सुमारे १० लाख रुपयांचे नवीन मोबाइल चोरून नेले.
मोबाईल शॉपीचे मालक जितेंद्र कासलीवाल हे शुक्रवारी रात्री दुकान बंद करुन गेल्यानंतर शनिवारी मध्यरात्री पहाटे ४ ते ५ च्या सुमारास अज्ञात ४-५ चोरट्यांनी शटर्सची कुलुपे व सेंट्रल लॉक तोडून दुकानात प्रवेश करीत िवविध कंपन्यांचे सुमारे ८० ते १०० मोबाईल फोन १० लाख रुपये किमतीचे चोरुन नेल्याची घटना घडली. दुकानाचे मालक जितेंद्र कासलीवाल शनिवारी सकाळी दुकान उघडण्यास आले असता त्यांना शटर्सची कुलुपे तोडल्याचे व चोरी झाल्याचे निदर्शनास आले. शहर पोलीस ठाण्यात मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरीस गेल्याची खबर मिळताच स.पो.नि.संभाजी पाटील व समाधान सुरवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीच्या घटनेची माहिती घेतली. चोरट्यांनी चोरी करतांना पुरावे न ठेवल्यामुळे तपासासाठी श्वानपथक मागविता येणार नसल्याचे नमुद केले.
कासलीवाल यांचे दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेजची पाहणी पोलीसांनी केली असता त्यामध्ये तोंडावर रुमाल बांधलेले ४-५ चोरट्यांचे चेहरे दिसत आहेत. जितेंद्र कासलीवाल यांनी शहर पोलीस ठाण्यात मोबाईल शॉपी चोरी प्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत फिर्याद नोंदविली आहे.