संघटनेची बैठक नुकतीच भिंगार शहरात पार पडली. त्यात या निवडी झाल्या. महाराष्ट्रात दिवसेंदिवस समाजावर अन्याय, अत्याचाराची मालिकाच सुरू आहे. ती थांबली पाहिजे. समाजाच्या विविध प्रश्नांसाठी महासंघ लढा देत आहे. या संघटनेत काम करताना खऱ्या अर्थाने पदाचा उपयोग समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी झाला पाहिजे. महासंघाची ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहचवून महासंघाशी सर्वसामान्यांना जोडण्याचे काम नवीन पदाधिकाऱ्यांनी करावे, असे प्रतिपादन महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन नवगिरे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी रामदास साळवे, पारनेर तालुका संघटकपदी अमोल साळवे, नगर तालुका संपर्क प्रमुखपदी अनिल वैराळ यांची निवड करण्यात आली.
यावेळी लहूसंग्राम प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक सचिन शिरसाठ, जिल्हाध्यक्ष मयूर लोखंडे, युवा अध्यक्ष राहुल सकट, लहूसंग्राम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सागर गायकवाड, मानवहित लोकशाही पार्टीचे भिंगार शहराध्यक्ष कैलास साळवे, मारुती वैराळ, शंकर पवळ, सागर वैराळ, निशांत ननवरे, मनेश ननवरे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
------------