कोपरगाव : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रकल्प प्रदर्शनात समता इंटरनॅशनल स्कूलच्या शुभ राजू मतसागर (६ वी) हिच्या ऑटो फ्लश टॉयलेट, अनय नितीन बोरणारे (८ वी ) याच्या कोरोना वाॅच तर पुष्कर धनंजय महाडिक (७ वी ) कोविड सिक्युरिटी डोअर या प्रकल्पांची निवड इन्स्पायर अवाॅर्डसाठी झाली. २०१० पासून प्रत्येक वर्षी हे प्रकल्पप्रदर्शन आयोजित केले जाते. सलग तिसऱ्यावर्षी निवड झाली. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दहा हजार रुपये बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले.
या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिक्षक अनिस शेख व शाळेतील विज्ञान विभागाच्या सर्व शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, मॅनेजिंग डायरेक्टर संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन, उपप्राचार्य विलास भागडे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. (वा. प्र.)
------