शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

सेनेला सध्या उठताबसता संग्राम जगतापच दिसतो : संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 4:36 PM

खोटे गुन्हे दाखल करण्याच्या संभाषणाचा समावेश असलेल्या व्हायरल क्लिपमागील सत्य उलगडून सांगत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सेनेची पोलखोल केली़

अहमदनगर : खोटे गुन्हे दाखल करण्याच्या संभाषणाचा समावेश असलेल्या व्हायरल क्लिपमागील सत्य उलगडून सांगत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सेनेची पोलखोल केली़ यापूर्वीही आपणावर गुन्हा दाखल केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी सेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर नाव न घेता केला़महापालिकेचे शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर बूट फेकतानाची एक क्लिप सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे़ राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी या क्लिपवरून सेनेला लक्ष्य केले़ ते म्हणाले, सेनेला सध्या उठबस संग्राम जगतापच दिसतो आहे़ शिवसेनेकडून खोटे गुन्हे दाखल करून अधिकाऱ्यांवर दहशत व जनतेवर जरब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ मलाही खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला़ खोटे गुन्हे कसे दाखल करतात, याचा व्हिडीओ प्रसारित झालाअसून, खोट्या गुन्ह्यांचे ते मार्गदर्शक आहेत असा आरोप जगताप यांनी केला़आमदार संग्राम जगताप यांच्या दबावामुळे अधिकाऱ्यांनी सेनेच्या पदाधिकाºयांविरोधात गुन्हे दाखल केले, या सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केलेल्या आरोपालाही त्यांनी उत्तर दिले़ ते म्हणाले, ठेकेदारावर दबाव आणल्याचा त्यांचा आरोप खोटा असून, उलटपक्षी आमच्या सत्तेच्या काळात आम्ही ठेकेदाराला दंड केला होता़ ठेकेदाराकडे त्यांनी काही मागणी केली असेल ती पूर्ण न झाल्याने हा प्रकार झाला, असा संशयही त्यांनी व्यक्त केला़ बोल्हेगाव रस्त्याच्या कामासाठी निधीची मागणी केली होती़ त्याची प्रत महापौर कार्यालयाकडे दिली होती़रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक पाठपुरावा करत असून, यापूर्वी आंदोलनही केलेले आहे असे सांगून ही मंडळी खोटे गुन्हे दाखल करून जनतेत जरब निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत़ त्यामुळे त्यांच्याच काही कार्यकर्त्यांचे संसार उदध्वस्त झाले असून, ते व्यसनाधीन झालेले आहेत़ राजकारणासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात असून, आपणही त्याचा बळी ठरलो आहे़ वर्षभरापूर्वी पोलिसांनी दिलेल्या अहवालावरून ते स्पष्ट झालेले आहे,असेही जगताप म्हणाले़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangram Jagtapआ. संग्राम जगताप