गेले आठवडाभरापासून त्यांच्यावर साईसंस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. गेली तीस वर्षांपासून बातमीदारी करताना गोरगरीब, अडले-नडलेल्यांना पूर्णवेळ उपलब्ध असलेला व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळप्रसंगी कुणाशीही वाईटपणा घेणारा पत्रकार अशी सदाफळ यांची ओळख होती. शिर्डी प्रेस क्लब व तालुका पत्रकार संघटनेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेले सदाफळ तालुक्यातील पत्रकारांसाठी आधारवड होते.
तालुक्यात सर्व क्षेत्रात दांडगा संपर्क व शेतीविषयक जाण असलेले ते लिहिते पत्रकार होते. शिर्डीतील भाविकांच्या समस्या, संस्थानच्या विकासात्मक बाबींची पत्रकारिता करताना सदाफळ यांनी अनेकदा संस्थान व्यवस्थापन, प्रशासनाला मार्गदर्शक ठरेल, अशी बातमीदारी केली. सदाफळ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब, सुभाष यांच्यासह तीन भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.
अशोक सदाफळ