अहमदनगर : नगर-पुणे महामार्गावर जातेगांव घाटात सकाळी सातच्या दरम्यान ट्रक कराला धडकून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. मृतापैकी एक जण पोलिस अधिकाऱ्याचा भाऊ असून दोघेही श्रीरामपूरचे रहिवासी आहेत.
गुरुवारची रात्र ही अपघातांची मालिका घेऊन येणारी ठरली आहे. रात्री एकच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर कंटेनरची लक्झरी बसला धडक बसल्याने पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. तर या अपघातस्थळापासून 100 मीटर अंतरावरच आज सकाळी टेम्पो पलटी होऊन एकजण किरकोळ जखमी झाला आहे.
मध्यरात्रीपासून सुपा पोलिस अपघातांच्या घटनांमध्येच व्यस्त आहेत.