कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे पर्यवेक्षक नारायण नाईक यांनी केले. अशोक जेजुरकर यांनी रयत शिक्षण संस्थेत ३३ वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले. तीन वर्षांपूर्वी त्यांची पुणतांबा येथे प्राचार्यपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कॉम्प्युटर लॅब, सर्व डिजिटल क्लासरूम, सायकल स्टॅण्ड, सुशोभित ग्रंथालय, आदी कामे त्यांनी केली. या कार्यक्रमाला स्कूल कमिटीचे अध्यक्ष दिनकर भोरकडे, त्रिंबक बोरबने, भाऊसाहेब पेटकर, उत्तम कुताळ, कल्पना झाल्टे, वरिष्ठ लिपिक पोपट कडू, नरेंद्र ठाकरे, रखमाजी अनाप, मनोज गुजराथी, गणपत मानकर, शशिकांत जेजुरकर, हौसा बापू जेजुरकर, अरुण मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पानगे यांनी केले. आभार प्रदर्शन महेश घुले यांनी केले.
300621\dsc_01234.jpg
पुणतांबा येथील न्यू इंग्लिश स्कुलचे प्राचार्य जेजुरकर यांचा सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न