निघोज : बेंटली सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या सेवाभावी संस्थेच्या वतीने चोंभूत (ता.पारनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस संगणक, एलसीडी स्क्रीन, साऊंड, प्रोजेक्टर अशा वस्तूंचा ई -लर्निंग सुविधा संच नुकताच देण्यात आला.
राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक बाळासाहेब कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून हा संच शाळेला मिळाला. यावेळी माजी सरपंच दत्तात्रय म्हस्के, मुख्याध्यापक कुसुम ठुबे, पालक संघ अध्यक्ष शिवाजी कोल्हे, बबन कोल्हे, गोरक्ष माळी, निवृत्ती कोल्हे, एस. साबळे, आर. शिगदाळे, जयश्री जमदाडे, सविता सोनवणे, कांचन म्हस्के, सविता म्हस्के, सीमा खांडेकर, मोनिका पारखे, राजश्री सोनवणे, वंदना पाडेकर, निर्मला गाडेकर, रेखा येवले, जया कुलथे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय शिर्के यांनी केले. एस. शिरोळे यांनी आभार मानले.
----
१० चोंभूत
चोंभूत शाळेला ई-लर्निंग सुविधांचा संच देण्यात आला.