श्रीगोंदा : शहरातील औटीवाडी शाळेतील शिक्षकांनी दररोज पाच विद्यार्थ्यांना बोलावून सेतू अभ्यासक्रम सुरू केला आहे. सिद्धार्थनगर शाळेतील शिक्षकांनी सेतू अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी गृहभेटीचा उपक्रम हाती घेतला आहे.
सोमवारी दुपारी औटीवाडी येथील प्राथमिक शाळेस भेट दिली असता मुक्ताबाई हराळ या शिक्षिका ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाहीत, अशा विद्यार्थ्यांना शिकवित होत्या. मुख्याध्यापक बाळू मोरे हे विद्यार्थ्यांचे जन्म दाखले आणण्यासाठी पालकांकडे गेले होते. सुलभा जगताप रजेवर होत्या.
शाळेचा पट ४८ आहे. त्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाऐवजी ऑफलाइन शिक्षण देण्याचे काम शिक्षकांनी हाती घेतले आहे. शहरातील सिद्धार्थनगर शाळेत शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती होती. मुख्याध्यापक संदीप मोटे, शारदा शेळके, मंगल जाधव या शिक्षकांनी सेतू अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी गृह भेटी सुरू केल्या आहेत.
पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी तयार आहेत.
----
०५ औटीवाडी शाळा
औटीवाडी शाळेत दररोज पाच विद्यार्थ्यांना बोलावून सेतू अभ्यासक्रम घेतला जातो.