शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
2
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
3
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका!
4
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"
5
कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने
6
छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत
7
Jayashree Thorat: वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा; रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'असं बोलणं खपवून घेणार नाही'
8
"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."
9
IND vs NZ : छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं
10
"पत्र इंग्रजीत लिहा, मला हिंदी येत नाही", केंद्रीय मंत्र्यांच्या पत्राला द्रमुक खासदाराने दिले उत्तर!
11
Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी?
12
एका धावेत गमावले तब्बल ८ बळी! ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत स्पर्धेत झाला अजब खेळ
13
पुण्यात Mitchell Santner चा पुन्हा 'पंजा'; टीम इंडियातील 'शेर' सपशेल ढेर
14
Fake Amul Ghee Packet: ऐन दिवाळीतच अमूलचं बनावट तूप बाजारात; खुद्द अमूलनंच सांगितलं, कसं ओळखाल...
15
मविआचेच ठरेना, त्यात मित्रपक्षाचा अल्टिमेटम; वेगळा निर्णय घेण्याची तयारी? चर्चांना उधाण
16
Relationship: डिजिटल कंडोम लाँच झाला; त्या क्षणांवेळी कसा वापर करायचा? पार्टनरही राहणार सुरक्षित
17
मोठी घडामोड! अनंत अंबानींनी घेतली फडणवीसांची भेट; मध्यरात्री दोन तास चर्चा
18
Ashish Shelar : "आपल्याच घरचा मुलगा निवडून आणू, अमित ठाकरेंना महायुतीने समर्थन द्यावं"
19
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
20
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!

संगमनेर तालुक्यात सात कोरोनाबाधीत रुग्ण; इतरांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 11:39 AM

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू कोरोनाची लागण होऊन झाला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील कुरण रस्ता परिसरातील एका महिलेला देखील कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी (८ मे) रात्री उशिरा धांदरफळ बुद्रूक येथील आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे या गावातील सहा तर शहरातील एक असे कोरोनाचे एकूण सात रूग्ण संगमनेर तालुक्यात आहेत.

संगमनेर : तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू कोरोनाची लागण होऊन झाला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील कुरण रस्ता परिसरातील एका महिलेला देखील कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी (८ मे) रात्री उशिरा धांदरफळ बुद्रूक येथील आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे या गावातील सहा तर शहरातील एक असे कोरोनाचे एकूण सात रूग्ण संगमनेर तालुक्यात आहेत. लागण झालेली शहरातील महिला कुणाच्या संपर्कात येऊन तिला कोरोना झाला. याचा शोध सुरू आहे. शहरातील इस्लामपुरा, कुरण रोड, बिलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, कुरण (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बुद्रूक (संगमनेर तालुका) हा परिसर हॉटस्पॉट म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घोषित केला आहे. या क्षेत्रातील सर्व अस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी ९ ते २२ मे २०२० रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.संगमनेर शहरात भरणारा भाजीपाला, मोंढा बंद संगमनेर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संगमनेर शहरातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी संगमनेर शहरातील भरणारा भाजीपाला, मोंढा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांनी दिली. शहरात कोठेही भाजीपाला बाजार भरणार नाही. याची सर्व शेतकरी, घाऊक भाजीपाला विक्रेते, रिटेल भाजीपाला विक्रेते यांनी नोंद घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. बांगर म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याSangamnerसंगमनेरhospitalहॉस्पिटल