धामोरी : कोपरगाव तालुक्यातील धामोरी व परिसरातील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. धामोरी गावात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ नये, याकरिता ग्रामपंचायत व कोरोना दक्षता कमिटीतर्फे सावता महाराज सभामंडपात सर्वपक्षीय आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत गावातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी दिनांक ४ मे ते १० मे या कालावधीत गावातील दवाखाने व मेडिकल सेवा वगळता इतर सर्व आस्थापना/दुकाने (किराणा दुकान, भाजीपाला, फळे व इतर सर्व दुकाने) बंद राहतील, असे सर्वानुमते ठरले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीसपाटील संगीता ताजणे यांनी केले आहे. यावेळी कैलासराव माळी, अशोकराव भाकरे, उपसरपंच प्रभाकर मांजरे, विजय ताजणे, डॉ. कृष्णाराव जगझाप, डॉ. रामदास जाधव, डॉ. गणेश बोराळे, डॉ. सोमनाथ म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य सुभाष आहिरे, बबन भाकरे, सतीश कोळपे, नंदकुमार माळी, नाजीम शेख, ग्रामसेवक एफ. एन. तडवी, लिपिक राजीव वेलजाळे उपस्थित होते.