नेवासा : करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या उद्देशाने शहरात हॉटस्पॉट पॉकेट जाहीर केले आहेत. असे असताना घराबाहेर पडून ‘मॉर्निंग वॉक’ची हौस पूर्ण करणाºया सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे यांनी दिलेल्या फियार्दीवरून नेवासा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास पोलीस निरीक्षक रणजित डेरे,पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे,पोलीस कॉन्स्टेबल प्रताप दहिफळे,पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खेडकर व पोलीस मित्र मोहन गायकवाड हे शहर व परिसरात गस्त घालत होते. यावेळी शहरात मॉर्निंंग वॉक करताना काही जण आढळून आले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतीही ठोस कारणे दिली नाहीत. अनावश्यकरित्या फिरत असल्याचे दिसून आल्याने मुस्सा गणी शेख (रा. नाईकवाडी गल्ली, नेवासा खुर्द), हुसेन इब्राहिम सय्यद(रा. नाईकवाडी गल्ली, नेवासा खुर्द), सुरेश जगन्नाथ देशमुख(रा. जुने कोर्टगल्ली,नेवासा खुर्द), निकुलस शामियल गायकवाड (रा. पोलीस लाईन शेजारी,नेवासा खुर्द), अरुण रंगनाथ भोसले(रा.गांधीनगर,नेवासा खुर्द), मच्छिंद्र मोहिनीराज थोटे (रा. विवेकानंद नगर, नेवासा खुर्द), राजमोहमद निजामुद्दीन बागवान (रा. नेवासा खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ------------------------------------
‘मॉर्निंग वॉक’ करणाºया सात जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 3:49 PM