शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
5
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
6
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
7
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
8
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
9
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
10
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
11
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
12
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
13
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
14
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
15
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
16
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
17
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
18
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
19
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
20
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट

ऑक्सिजनअभावी सात रुग्णांचा मृत्यू?; इतर आजारांमुळे मृत्यू झाल्याचा प्रशासनाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 6:17 AM

नगरमधील घटना : इतर आजारांमुळे मृत्यू झाल्याचा प्रशासनाचा दावा

अहमदनगर : येथील एका खासगी रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने तत्काळ संबंधित हॉस्पिटलची चौकशी करून सदर मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने नव्हे तर कोरोना आणि इतर गुंतागुंतीच्या आजारांमुळे झाल्याची सारवासारव केली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणेने संबंधित खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली. तेथील डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर सदर मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यामुळे नव्हे तर इतर आजारांमुळे झाल्याचे सांगितले. दरम्यान पोलीस यंत्रणेने या रुग्णालयाभोवती बंदोबस्त तैनात केला आहे. 

नगर जिल्ह्यात ऑक्सिजनची तीव्र टंचाई आहे. जिल्ह्यासाठी रोज  ६० मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. त्यात सोमवारी २० तर मंगळवारी ५० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते. तिथे रांगा असल्याने खासगी रिफिलिंग प्लांटवर दहा  ते बारा तासांनी ऑक्सिजन मिळतो. हीच परिस्थिती एका खासगी रुग्णालयातील रुग्णांवर बेतली व त्यातच रुग्णांचा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून  करण्यात येत आहे.

एकाच वेळी नव्हेतर, २४ तासांत झाले मृत्यू

त्या हॉस्पिटलमध्ये सात जणांचा मृत्यू हा एकाच वेळी नव्हे तर २४ तासांमध्ये झालेला आहे. संबंधित हॉस्पिटलला ऑक्सिजनचा आवश्यक तेवढा साठा उपलब्ध होता. गुंतागुंतीच्या आजारामुळे येथील रुग्ण आधीच गंभीर होते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनAhmednagarअहमदनगर