अकोले: तालुक्यात रुग्णसंख्या ७३ वर पोहचली आहे. तालुक्यात बुधवारी दुपारी दोन कोरोना बाधित अढळल्यानंतर सायंकाळी पुन्हा पाच जण कोरोना बाधित आढळून आले आहे. शहरालगतच्या धुमाळवाडीत ७ वर्षाच्या मुलासह आईही पॉझिटीव्ह आली आहे. बहिरवाडीत ३, तर पेंडशेतमध्ये २ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
अकोले तालुक्यात हळूहळू कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तालुक्यातील विरगाव येथिल ३१ वर्षीय पुरुष,केळी येथील ७५ वर्षीय पुरूष व अहमदनगर येथे खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेली राजुर येथील ८० वर्षिय महिलाचा पॉझिटीव्ह अहवाल तालुक्यातील रुग्णसंख्येत समाविष्ट झाल्यानंतर बुधवारी दुपारी तालुक्यातील धुमाळवाडी येथील ०७ वर्षीय मुलगा व आदिवासी भागातील पेंडशेत येथील २७ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर सायंकाळी अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेत आलेल्या अहवालात पेंडशेत येथील ८१ वर्षीय पुरुष, धुमाळवाडीतील २८ वर्षीय महिला तर बहिरवाडी येथील ९० वर्षीय व ४२ वर्षीय महिला तर ३९ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
आता तालुक्यात रुग्णांची संंख्या वाढुन ती ७३ झाली आहे. त्यापैकी ४१ जण कोरोनामुक्त झाले २ मयत तर ३० जणांवर उपचार सुरु आहे.