मंगळवारी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी खर्डा येथे अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी दुकाने सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने कारवाई करण्यात आली. खर्डा येथे २५ मे ते १ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी नष्टे, तहसीलदार नाईकवाडे, पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र सुरवसे, पालक अधिकारी विष्णू शिंदे, तालुका भूमिअभिलेख अधिकारी मनीषा धीवर, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य वैभव जमकावळे, मदन पाटील आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीला लॅब असिस्टंट देऊन गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला प्रांताधिकारी नष्टे यांनी दिले. पालक अधिकारी यांच्यामार्फत "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या अभियानाअंतर्गत पंधरा दिवसातून एकदा सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, खर्डा डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ. संतोष लोंढे, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, महालिंग कोरे, वैजिनाथ पाटील, राजू मोरे, अशोक खटावकर, कोतवाल अन्वर बागवान यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.