अण्णा नवथरअहमदनगर : मूल नको असल्याने होणाऱ्या गर्भपातात चालू वर्षी तिपटीने वाढ झाली असून, जिल्ह्यातील सात हजार मातांनी चार महिन्यांच्या आतील बाळांच्या जन्मास थेट नकार देत गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाढत्या गर्भपाताची संख्या आरोग्य विभागाच्या चिंतेचा विषय बनला आहे.लिंग तपासणीला कायद्याने बंदी आहे. पण, गर्भधारणेनंतर बाळच नको, म्हणून गर्भपात करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अहवालात समोर आले. सन २०१५ पासूनची आकडेवारी आरोग्य विभागाने संकलित केली. त्यानुसार २०१७-१८ या वर्षात ७ हजार १९५ गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने झाले आहेत. केंद्र शासनाच्या १९७१ च्या कायद्यानुसार वीस आठवड्यापर्यंतचा गर्भ काढून टाकण्यास मुभा आहे. या कायद्याच्या आधारे मूल नको, अशी इच्छा डॉक्टरांकडे व्यक्त केल्यास एक अर्ज भरल्यानंतर गर्भपात करून मिळतो. सन २०१५ ते १७, या काळात दरवर्षी दीड ते दोन हजारांपर्यंत गर्भपात झाले़ २०१८ मध्ये ही संख्या तिपटीने वाढली़ ती वाढण्यामागे नेमकी काय कारणे आहेत, याचा शोध जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे.
वैद्यकीय सल्ल्याने झालेले गर्भपातसन २०१५ --- १८९५सन २०१६ --- १९४८सन २०१७ ---२०३९सन २०१८ --- ७१९५नगर शहरात सर्वाधिक गर्भपातहॉस्पिटल हब म्हणून ओळखल्या जाणा-या नगर शहरात खासगी रुग्णालयांत चालू वर्षी सर्वाधिक ५ हजार ७२७ गर्भपात झाले आहेत. मागील तीन वर्षांत हे प्रमाण अत्यल्प होते. चालू वर्षी एकदम तीन पटींनी त्यात वाढ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तालुकानिहाय गर्भपातअकोला-९४, जामखेड-२४, कर्जत-१०, कोपरगाव-७, नगर-५ हजार, २२७, नेवासा-६०, पारनेर-२८, पाथर्डी-२, राहाता-२३०, राहुरी-११३, संगमनेर-९२, शेवगाव-५५६, श्रीगोंदा-१९, श्रीरामपूर-२३३