२४ ते ३० जून या कालावधीत प्रत्येक गावातील तलाठी कार्यालयात या शिबिराचे आयोजन केले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये १ ऑगस्ट २०१६ पासून संगणकीकृत सातबाराचे वाटप करण्यात येत आहे. मूळ हस्तलिखित उतारा व संगणकीकृत उतारा यामध्ये काही तफावत असल्यास त्या तफावती या शिबिरामध्ये दुरुस्त करण्यात येतील. यासाठी उतारा दुरुस्तीबाबत सर्व कागदपत्रे, जुने हस्तलिखित उतारे, मूळ नक्कल प्रत व जमीन महसूल अधिनियमानुसार सातबारा उतारा दुरुस्तीसाठी अर्ज सादर करावा.
२ व ३ जुलै या दोन दिवशी राहुरी, टाकळीमियाँ, ब्राह्मणी, देवळाली प्रवरा, वांबोरी, ताहराबाद, सात्रळ या मंडलांच्या कार्यालयाच्या ठिकाणी सकाळी ११ ते २ या वेळेत हे शिबिर चालू राहील. तरी या शिबिरात खातेदारांनी सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन राहुरीचे तहसीलदार आर. एफ. शेख यांनी केले आहे.