शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
2
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
3
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
4
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
5
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
6
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
7
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण
8
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
9
"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
10
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
11
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
12
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
13
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
14
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
15
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
16
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
17
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
18
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
19
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
20
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त महिलेचा विनयभंग-मारहाण : गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 6:16 PM

शनी शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या महिला विश्वस्ताचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी विश्वस्त वैभव सुखदेव शेटे यांच्यासह ८ ते १० जणांवर शनी शिंगणापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा : शनी शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या महिला विश्वस्ताचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी विश्वस्त वैभव सुखदेव शेटे यांच्यासह ८ ते १० जणांवर शनी शिंगणापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वैभव सुखदेव शेटे, सोमनाथ बापूसाहेब शेटे, एकनाथ भाऊसाहेब शेटे, नवनाथ भास्कर शेटे, मयूर जालिंदर देठे, बलभीम भाऊराव दाणे (सर्व रा.शनी शिंगणापुर ता.नेवासा) यांच्यासह ८ ते १० जणांच्या विरोधात विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे.याबाबत महिला विश्वस्तानी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि ३१ जुलै २०१८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शनी मंदिर येथे प्रशासकीय कार्यालयात मिटिंग हॉलमध्ये मिटिंगच्या कामासाठी पती समवेत गेले होते. मागील महिन्यात झालेल्या उपोषण संदर्भातील कागदपत्रांच्या नकला रजिस्टर झेरॉक्स प्रति उपोषण कर्त्यांना देण्याकरिता मिटिंग चालू होती. त्यावेळी मयूर देठे हा मोबाइलवर मिटिंगची शूटिंग काढत होता. त्यावेळी सर्व विश्वस्त उपस्थित होते. दरम्यान त्याला मी ‘तू शूटिंग काढू नको’ असे म्हटले असता याचा त्याला व इतर जमलेल्या काही लोकांना राग आला. त्यावेळी मयूर जालिंदर देठे याने त्याचे हातातील मोबाईलचा कॅमेरा बंद केला असता वैभव शेटेसह ८ ते १० जणांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून हाताला धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल. मला लाथा बुक्कयांनी मारहाण केली. माझ्या हातावर मारल्याने हातातील बांगडीच्या काचा फुटून त्या हातात घुसल्या आहे. माझ्या पतीला ही धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी या लोकांनी दिली. या झटापटीमध्ये माझे गळ्यातील दागिने तुटून गहाळ झाले आहेत, असे महिला विश्वस्ताने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshani shinganapurशनि शिंगणापूर