सन्मतीवाणी
तीर्थकार शांतीनाथ भगवान हे भक्तांचे तारणहार आहेत. त्यांच्याजवळ चक्रवर्तीचे वैभव होते. त्यांनी तपस्या करुन तीर्थकार पद प्राप्त केले. महापुरुषांच्या मार्गदर्शनाने मन, काया, वाचा यावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग सापडतो. गुरुपासून काहीही लपवायचे नसते. भगवान शांतीनाथ हे यश- लक्ष्मीचे दाता आहेत. महापुरुषांच्या संगतीत पापाचा हिस्सा कमी होतो. त्यांच्यात प्राणीमात्राविषयी वात्सल्याची भावना असते. सर्वांचे दु:ख हरण व्हावे आणि सर्व सुखी व्हावेत हेच त्यांचे ध्येय. धर्मसत्ता ही राजसत्तेला मार्गदर्शन करते. राजाला धर्माचा आधार घ्यावा लागतो. तरच राजसत्ता चांगल्या प्रकारे चालू शकते. भोगीला मुनी, खुनीला मुनी बनविण्याची ताकद महापुरुषांमध्ये असते. प्रत्येक स्वप्न पूर्ण होते. पण त्याकरिता पुरुषार्थ करावा लागतो. नातेसंबंधाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पशु-पक्षांना नात्याशिवाय जगता येते. पण मानवाला जगण्यासाठी नात्यांचा आधार घ्यावाच लागतो. क्रोध, माया, मोह जीवन बिघडवितात. नात्यामुळे कर्माचा नाश होतो. सुख प्राप्त होते. महापुरुषांची चेतना जीवनाला उजाळा देते. नातेसंबंध टिकले तरच परिवार सुखी होतो. चांगले बी पेरले तरच चांगले रोप येते. त्याला चांगले फळ येते. अहंकार स्वत:ला समर्थ समजतो. इतरांना तुच्छ समजतो. दुसºयांना लायक समजण्यातच समर्थ व्यक्तीचा पुरुषार्थ आहे. चांगले विचार, चांगले वर्तन आणि चांगली संगतच जीवन सुखी बनविते. - पू. श्री. सन्मती महाराज