अहमदनगर, दि. 29 - सरकारने शेतक-यांच कर्ज पूर्ण ‘फिटलं’ म्हणावं. तत्वत:, अंशत: या थापा आहेत. मोदींना उत्तरप्रदेशची कर्जमाफी चालते मग महाराष्ट्राच्या कर्जमाफीचा बोजा का वाटतो, असा सवाल शरद पवार यांनी केला.
पद्भूषण सन्मान मिळाल्याबद्दल व संसदेतील कारकीर्दीला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नगर जिल्ह्याच्या वतीने शरद पवार यांचा भेंडा (ता नेवासा) येथे सर्वपक्षिय सत्कार करण्यात आला यावेळी पवार बोलत होते. मोदी म्हणतात, कर्जमाफी घातक आहे़ माझं त्यांना म्हणणं आहे, उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले व तशी घोषणाही केली. उत्तरप्रदेशात तुम्हाला कर्जमाफी घातक वाटत नाही. मग महाराष्ट्रात कशी वाटते? माझी करंगळी पकडून मोदी राजकारणात आले ते नेहमी सांगतात, पण आता मीच माझ्या करंगळीचं माप शोधतोय, अशी मिश्किल थट्टा पवार यांनी केली. शेतपिकाला योग्य किमत मिळाल्याशिवाय शेतकरी समृद्ध होणार नाही. अन्यथा असे कर्जमाफीचे निर्णय वारंवार घ्यावे लागतील. नगर जिल्ह्यातून मला राजकारणाचे बाळकडू मिळाले व येथूनच माझ्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली, असा उल्लेखही पवार यांनी केला.
आम्ही पवारांसोबतमहाराष्ट्रात विविध खो-यांमध्ये पाण्याची समस्या बिकट बनली आहे़ पाणी प्रश्नावर पवारांनी नेतृत्व करण्याची गरज आहे़ त्यासाठी आम्ही सर्व पवार यांच्यासोबत राहू, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिली.