Sharad Pawar ( Marathi News ) : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन होता, दोन्ही गटांनी हा वर्धापन दिन सोहळा साजरा केला. शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. गेल्या काही दिवसापासून लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता. आता लोकसभेचा प्रचार थांबला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका करताना भटकती आत्मा या शब्दाचा प्रयोग केला होता. दरम्यान, आता या टीकेवर खासदार शरद पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
शरद पवार म्हणाले, मोदी साहेबांचा प्रचार मी सांगण्याची गरज नाही. पंधानमंत्रिपदावर बसलेली व्यक्ती निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते. पंतप्रधानमंत्री एका पक्षाचा नसतो, देशाचा असतो. त्यांनी सर्व जाती धर्म, भाषा आणि प्रांताचा विचार करायचा असतो. हे त्यांनी मुद्दाम केलं. कारण त्यांची विचारधारा तशीच आहे, आज या लोकांसाठी एक प्रकारची कामगिरी राज्यकर्त्यांनी करावी लागते. प्रचारसभेत मोदी म्हणाले की, हातातून सत्ता गेली तर तुमचं मंगळसुत्र काढून घेतली, यापूर्वी असं कधी घडलं आहे का?, असा सवालही शरद पवार यांनी केला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मर्यादा पाळल्या नाहीत. आम्ही राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतो, पण मर्यादा पाळतो. त्यांनी माझा भटकता आत्मा म्हणून उल्लेख केला. एका दृष्टीने बर झाले, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असा पलटवार शरद पवार यांनी केला.
लोकांना मनापासून सेवा करण्याचे वचन देऊया
शरद पवार म्हणाले,शिवसेनेची बाळासाहेब ठाकरे यांनी निर्मिती केली. शिवसेनेने राज्य केले. त्यांनी मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढवला, त्यांचा उल्लेख करताना त्यांनी नकली बापाची शिवसेना असा केला. हे त्यांना शोभते का? असा सवालही पवार यांनी केला. त्यांना तारतम्य राहिले नाही, सत्ता जाणार हे दिसले की माणूस अस्वस्थ कसा होतो हे यातून दिसले आहे, असंही शरद पवार म्हणाले.
"आपण नव्या विचारांनी जाऊया. समाजातील सर्व घटकांसाठी आणि त्यांच्या हितासाठी काम करुया, निवडणुका येतील, आपण निवडणुकांना सामोरे जाऊया. लोकांना मनापासून सेवा करण्याचे वचन देऊया, असंही शरद पवार म्हणाले.