अहमदनगर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा शेतकरी हा आत्मा आहे, असे सांगितले जाते. मात्र कृषी कायद्यावर राज्यसभेत चर्चा सुरू असताना ते गैरहजर का होते ? पवार हे कृषिमंत्री असतानाच कृषी कायद्याचा मसुदा तयार झाला. त्यामुळे त्यांचा विरोध कायद्याला नव्हे तर सिस्टिमला आहे, अशी टीका केद्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार पाशा पटेल यांनी केली.
पंजाब व हरियाणा सोडले तर देशभरात कृषी कायद्याला कुठेही विरोध नाही. प्रातिनिधिक आंदोलने सोडली तर आंदोलनाला जनाधार कुठेही नाही. आंदोलनाला कुठेही जन सममर्थन नाही. दिल्लीत आंदोलन करणारे फक्त आधारभूत किमतीची मागणी करण्यासाठी आले होते. नंतर त्यात राजकारण घुसले. कृषी कायद्यामुळे शेतक-यांचे भलेच होणार आहे. स्पर्धा निर्माण होणार असल्याने पिकाला भाव मिळणार आहे, असेही पाशा पटेल म्हणाले.