शेवगाव : लॉकडाऊन काळात दुचाकीवरून रस्त्यावर विनाकारण फिरणाºयांच्या तब्बल ३८ मोटारसायकल जप्त करुन पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आल्या आहेत. १४८ दुचाकीस्वारांना मोटार वाहन कायद्यातर्गत दंडात्मक कारवाई करुन सुमारे तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गावठी दारुचे अड्डे उद्धवस्त करून पोलिसांनी संपूर्ण गावठी दारू नष्ट केली आहे. तोंडाला मास्क न लावणाºयांवर कठोर कारवाई केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेवगाव पोलिसांनी कंबर कसली असून गत महिन्यातील २२ मार्च पासून धडाकेबाज कारवाई केली आहे. शेवगाव शहरासह तालुक्यातील रांजणी, सोनविहीर, बोधेगाव, मुर्षदपूर , एरंडगाव, घोटण, सोनेसांगवी, चापडगाव आदी गावात देशी दारु विकणारे, हातभट्टी दारु तयार करुन विकणाºया २० आरोपींच्या विरोधात १७ गुन्हे दाखल करुन ९८ हजार ८२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तालुक्यातील निंबेनांदूर व अमरापूर येथे जुगार खेळणाºया १३ जणांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान दुकाने सुरू ठेवल्या प्रकरणी १३ जणांच्या विरोधात ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेवगाव शहर, शहरटाकळी, बोधेगाव, अमरापूर, थाटे, शिंगोरी गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावता, विनाकारण फिरणाºया १७ जणांच्या विरोधात ६ गुन्हे दाखल झाले आहेत. शेवगाव शहर व बोधेगाव येथे नाकाबंदी दरम्यान रस्त्यावर विनाकारण फिरणाºयांच्या ३४ मोटारसायकली जप्त करुन पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. १४८ वाहन चालकांवर वाहन परवाना, वाहनाचे कागदपत्र न बाळगणे, हेल्मेट न घालणे आदी स्वरूपाच्या मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करुन २९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शेवगाव-पैठण रोडवरील कहेर्टाकळी व शेवगाव- गेवराई रस्त्यावरील महारटाकळी येथे आंतरजिल्हा चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. शेवगाव शहरातील क्रांतीचौक, आंबेडकर चौक येथे नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी तालुक्यात सर्वत्र कारवाईचा धडाका सुरू केला असून यामुळे कोरोनाला नियंत्रित करण्यात यश येत आहे.
शेवगाव पोलिसांकडून गावठी दारूचे अड्डे केले उद्धवस्त,१४८ दुचाकी जप्त : जुगार खेळणाºया १३ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:20 PM