पाथर्डी : महाराष्ट्र शिक्षक कृतिशील शिक्षक सामाजिक प्रतिष्ठाणतर्फे वायकर वस्ती (ता.पाथर्डी) येथील प्रयोगशील शिक्षक पोपटराव फुंदे यांना उल्लेखनीय कार्याबद्दल ‘कृतिशील शिक्षक रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
फुंदे यांनी कोविडच्या संकटकाळात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक साहित्य निर्मिती करत ‘गुरुजी आपल्या अंगणी’ उपक्रमाद्वारे हसतखेळत सहज शिक्षण हा प्रयोग राबविला.
नगर येथे आयोजित कार्यक्रमात शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी औरंगाबादचे शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे, चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी अरुण धामणे, डाएटचे प्राचार्य डी. डी. सूर्यवंशी, रयतचे उपनिरीक्षक काकासाहेब वाळुंजकर, कृतिशील शिक्षक प्रतिष्ठाणचे राज्य संयोजक राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विक्रम अडसूळ, अनुराधा फुंदे, शिक्षक तुकाराम अडसूळ, मनोहर इनामदार आदी उपस्थित होते.
फोटो : ०७ पोपटराव फुंदे