श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्थानकासमोरील 103 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 42 तृतीपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांना हा हक्क मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मतदार म्हणून मान्यता मिळाली व लोकशाहीचा घटक बनता आले असल्याची प्रतिक्रिया लेखिका दिशा शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.देशाच्या जडणघडणीत आमचेही योगदान आहे. मतदान करणे हा लोकशाहीचा उत्सव आहे. मतदान करण्यासाठी सवार्नी घराबाहेर पडावे असे आवाहन दिशा पिंकी शेख यांनी केले आहे. दिशा या वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये आम्हाला माणूस म्हणून मान्यता दिली. त्यामुळेच या लोकशाहीच्या सर्वोच्च प्रक्रियेत आम्हाला सहभागी होता आले. त्यामुळे आम्ही सर्व जण आनंदी झालो आहोत, असे दिशा यांनी सांगितले.