शिर्डी : शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे दुस-या फेरीनंतर ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे सुरेश थोरात पिछाडीवर आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. दुस-या फेरीअखेर राधाकृष्ण विखे यांना ७ हजार १८३ तर सुरेश थोरात यांना २ हजार ५१ मते पडली आहेत. शिर्डीतून गृहनिर्माणमंत्री भाजपकडून रिंगणात होते. गृहनिर्माणमंत्री भाजपच्या तिकिटावर रिंगणात होते. या मतदारसंघातून ते यापुर्वी सहा वेळा आमदार झाले होते. १९९५ साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर राधाकृष्ण विखे आमदार झाले. १९९७ आणि १९९९ साली शिवसेनेकडून ते आमदार राहिले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये येत २००४, २००९ आणि २०१४ मध्ये आमदार झाले.
शिर्डी मतदारसंघ निवडणूक निकाल : राधाकृष्ण विखे ५ हजार मतांनी आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:03 AM