लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : पाकिस्तानने अटक केलेले भारताचे सुपूत्र कुलभूषण जाधव यांना भेटायला त्यांची आई व पत्नी गेले असता, त्यांना तेथे अतिशय वाईट वागणूक मिळाली. या घटनेची जगभरातुन निंदा होत असतांना शिर्डीतील तरुणांनी आज नागरीकांकडुन जुन्या चप्पल गोळा करून पाकीस्तानी दुतावासाला कुरीयरने पाठवल्या.पाकिस्तानच्या अमानवी वागणुकीबद्दल प्रचंड चीड व्यक्त होत आहे़ त्यात कुटूंबीयांना दिलेल्या घाणेरड्या वागणुकीचे तिव्र पडसाद उमटले़ या पार्श्वभुमीवर शिर्डीतील तरुणांनी आज एकत्र येत शहरासह मंदीर परिसरातुन फेरी काढली़ यावेळीत त्यांनी नागरीकांना आपल्या घरातील फाटलेले, खराब झालेले बुट, चप्पल पाकीस्तानी दुतावासाला पाठवण्यासाठी जमा करण्याचे आवाहन केले़ नागरीकांनीही या आवाहानला प्रतिसाद देत आपल्याकडच्या जुन्या चप्पल,बुट कार्यकर्त्यांकडे दिल्या़पाकीस्तानला चपलांची फार गरज आहे असे या घटनेतुन वाटते. त्यामुळे आम्ही पाकीस्तानी दुतावासाला जुन्या चप्पल, बुटांची भेट पाठवत आहोत, तसेच पाकीस्तान सरकारला पत्र पाठवुन त्यांच वागण मानवतेला धरुन नसल्याची जाणीवही करून देणार आहोत, असे विशाल कोळपकर व गोपी परदेशी यांनी सांगितले़ या आंदोलनात योगेश कुमावत, विराट पुरोहित, परीमल वेद, आकाश त्रिपाठी, रवि वैद्य, संदीप रोकडे, भैया रासने, मयुर चोळके, चेतन कोते आदी तरुण सहभागी झाले होते़ यावेळी पाकीस्तान निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या़