शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:50 IST

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २९) मतदान होत आहे़ गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला प्रचार शनिवारी सायंकाळी थंडावला.

शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २९) मतदान होत आहे़ गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला प्रचार शनिवारी सायंकाळी थंडावला. प्रचार फेऱ्या, सभा घेऊन शेवटच्या दिवशीही आरोप-प्रत्यारोप झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे शिर्डी मतदारसंघातील प्रचार चांगलाच तापला होता.शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. शिवसेनेकडून खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे, अपक्ष व भाजपचे बंडखोर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह २० उमेदवार रिंगणात आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, नितीन गडकरी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, करण ससाणे यांच्या पदाच्या राजीनाम्याने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकारणाने वेगळे वळण घेतले.लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली असून १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार येथे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. एल. सोरमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.याप्रसंगी निवडणूक निरीक्षक विरेंद्रसिंह बंकावत, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील, तहसीलदार (निवडणूक) हेमा बडे, नायब तहसीलदार गोसावी यांच्यासह विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी ८ लाख २१ हजार ४०१ पुरुष, तर ७ लाख ६१ हजार ८३२ महिला तर इतर ७० मतदार आहेत. निवडणूक कामासाठी नेमणूक असलेल्या ६ हजार ५४८ मतदारांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.मतदानासाठी १७१० मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर १० हजार २६० अधिकारी, कर्मचारी व १५९ क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर मतदानाच्या कालावधीत जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मतदार संघातील १७४ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार असून इतर १०१ मतदानकेंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे ९ मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले असून येथील सर्व अधिकारी, कर्मचारी हे महिला असणार आहे.लोकसभा निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. दि. २८ एप्रिल रोजी निवडणुकीसाठी नेमलेले अधिकारी साहित्यासह केंद्रांवर दुपारपर्यंत पोहोचणार आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019